जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 09:58 AM2019-07-01T09:58:31+5:302019-07-01T11:42:14+5:30
प्रशासनाकडून बचावकार्य सुरू
Next
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये बसला झालेल्या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 17 जण जखमी झाले आहेत. सध्या घटनास्थळी प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. बस केशवानहून किश्तवाडला जात असताना हा अपघात झाला. यामध्ये जखमी झालेल्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
#UPDATE: Death toll rises to 35. 17 people are injured, 3 out of whom have been airlifted to Jammu. Another helicopter flew to Kishtwar to airlift more injured. https://t.co/FOgS4tYypZ
— ANI (@ANI) July 1, 2019
केशवानहून किश्तवाडला जाणाऱ्या बसला सिरग्वारीमध्ये अपघात झाला. बस रस्त्यावरुन घसरल्यानं झालेल्या या अपघातात 35 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी पावणे आठच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यानं ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांनी सांगितलं.