Jammu and Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 04:51 PM2019-08-08T16:51:28+5:302019-08-08T16:52:00+5:30

जम्मू-काश्मीरमधलं कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान उघडा पडला आहे.

Jammu and Kashmir : no muslim countries with pakistan after india revoked article 370 in kashmir | Jammu and Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

Jammu and Kashmir : काश्मीरच्या मुद्द्यावर उघडा पडला पाकिस्तान, मुस्लिम देशांनीही सोडली साथ

Next

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधलंकलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान उघडा पडला आहे. भारताविरोधात आक्रमक झालेल्या पाकिस्ताननं भारताबरोबरचे व्यापारी संबंध तोडले आहेत. पाकिस्तानने बुधवारी (7 ऑगस्ट) भारतासोबतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. याशिवाय, भारतासोबतचे मुत्सद्दी संबंध सुद्धा डाऊनग्रेड केले आहेत. म्हणजेच, राजकीय संबंधांचा दर्जा कमी केला आहे. त्यानंतर पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तर, आता समझोता एक्सप्रेसही थांबविली आहे.

पाकिस्तानी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले असून भारतावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पाकिस्तानाकडून करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्ताननं हा विषय नेला असून, त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद अद्याप मिळालेला नाही. भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर गरळ ओकणाऱ्या पाकिस्ताकनडे सौदी अरब आणि खाडीतल्या मुस्लिम देशांनी पाठ फिरवली आहे.

भारतानं काश्मीरमधून कलम 370 हटवल्याचा अद्यापही आंतरराष्ट्रीय पातळीवरून कोणी विरोध केलेला नाही. पाकिस्तानचा नेहमीचा मित्र असलेला चीनही या मुद्द्यावर तटस्थ राहिला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं पाकिस्तानला हा सर्व घडामोडीवर नजर ठेवून असल्याचं सांगितलं आहे, पाकिस्तानला अमेरिकेकडून मिळालेला हाच काय तो दिलासा आहे. नाहीतर जगभरातून पाकिस्तानकडे पाठ फिरवण्यात आली आहे. 

त्यानंतर आता भारत-पाकिस्तान या दोन देशांतील नागरिकांना जोडणारी समझोता एक्सप्रेसही पाकिस्तानकडून थांबविण्यात आली आहे. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या सिव्हिल अ‍ॅव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, समझौता एक्सप्रेसबद्दल किती दिवसांसाठी बंद, हे निश्चितपणे सांगण्यात आलं नाही. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपण युद्धाला तैयार असल्याचं म्हटलं असून सीमारेषेवर सैन्यही तैनात करण्यात आले आहे.

Web Title: Jammu and Kashmir : no muslim countries with pakistan after india revoked article 370 in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.