Jammu And Kashmir : सोपोर चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 12:47 PM2019-08-03T12:47:33+5:302019-08-03T12:54:27+5:30
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (3 ऑगस्ट) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (3 ऑगस्ट) चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर एक जवान जखमी झाला आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोपोरमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
Baramulla: One Army personnel injured in exchange of fire between terrorists and security forces in Malmapanpora area of Sopore. Operation underway. #JammuAndKashmirpic.twitter.com/QUmL8TEU4U
— ANI (@ANI) August 3, 2019
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (27 जुलै) चकमक झाली. या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक उडाली होती. या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर मुन्ना लाहोरीचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले होते. 19 वर्षीय मुन्ना हा पाकिस्तानचा रहिवासी असून आयईडी तयार करण्यात एक्सपर्ट होता. शोपियान जिल्ह्यातील बोनाबाजार येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
#UPDATE Jammu & Kashmir: One terrorist killed in exchange of fire between terrorists and security forces in Malmapanpora area of Sopore. https://t.co/8lAvG4LDcN
— ANI (@ANI) August 3, 2019
पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका असल्याचे कारण सांगून केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी आणखी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 280 कंपन्या (28 हजार सशस्त्र पोलीस) पाठवल्याने श्रीनगर व संपूर्ण खोऱ्याला लष्करी तळाचे स्वरूप आले आहे. केंद्राने 25 जुलै रोजी 10 हजार सशस्त्र सैनिक पाठवले होते. याखेरीज काश्मीर खोऱ्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 65 हजार जवान तैनात असून, अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने आणखी 20 बटालियन पाठवण्यात आल्या होत्या. सशस्त्र दलाचे सुमारे एक लाख पोलीस काश्मीर खोऱ्यात आता असून, त्यामुळे तेथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काश्मीरमधील कायदा व सुव्यवस्था यासाठी तसेच दहशतवादी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी इतके सशस्त्र पोलीस रवाना करण्यात आले आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
अमरनाथ यात्रेकरू तसेच खोऱ्यात फिरायला आलेले पर्यटक यांनी ताबडतोब तेथून निघावे, अशा सूचनाही केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे पर्यटक व यात्रेकरूही घाबरून गेले असून, तेथून मिळेल त्या मार्गाने जम्मूकडे येण्यासाठी त्यांची घाई सुरू झाली आहे. दहशतवादी हल्ल्याचे कारण सांगून त्यांना तेथून निघून जाण्याच्या सूचना दिल्याने आपल्यावर लगेच हल्ले सुरू होतील की काय, अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यातच अमरनाथच्या मार्गावर पाकिस्तानी बनावटीचे भूसुरुंग व शस्त्रे मोठ्या प्रमाणात आढळल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याने तिथे प्रचंड घबराट आहे. सरकारने काश्मीर खोऱ्यात इतकी घबराट का निर्माण केली आहे, इतके सशस्त्र सैनिक खोऱ्यात अचानक का पाठवण्यात आले आहेत, याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारनेही दिलेले नाही. त्यामुळे तिथे अनेक अफवा पसरल्या आहेत. जम्मू-काश्मीर राज्याचे त्रिभाजन करण्याचा सरकारचा विचार असल्याची अफवाही त्यात आहे. काश्मीर खोरे, जम्मू व लडाख असे त्रिभाजन करण्याची केंद्र सरकार तयारी करीत आहे, असे अनेकांना वाटत आहे.