Jammu-Kashmir : एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 08:19 AM2018-10-13T08:19:08+5:302018-10-13T08:26:43+5:30
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बबगुंडमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सध्या तेथे शोध मोहीम सुरूआहे. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये सध्या पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे, तर दुसरीकडे पुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.
(धक्कादायक! काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांत 12 पोलीस कर्मचारी बनले दहशतवादी )
Pulwama: Encounter underway between terrorists and security forces in Babgund. More details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) October 13, 2018
#UPDATE Pulwama Encounter: One terrorist has been gunned down by security forces, arms and ammunition recovered https://t.co/l0eLWnTEVz
— ANI (@ANI) October 13, 2018
Pulwama: Encounter underway between terrorists and security forces in Babgund. More details awaited. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/dNUR5spMNW
— ANI (@ANI) October 13, 2018
एक पोलीस कर्मचारी शहीद
दरम्यान, शुक्रवारी उशिरा रात्री काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याची गोळी मारुन हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी पोलीस कर्मचारी जावीद अहमद यांच्या वारपुरा येथील निवासस्थानी घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. या हल्ल्यात अहमद यांचा जागीच मृत्यू झाला.
Pulwama: Encounter underway between terrorists and security forces in Babgund. More details awaited. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) October 13, 2018