Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येचा बदला; 2 दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 08:38 AM2022-06-15T08:38:29+5:302022-06-15T08:48:51+5:30
Jammu And Kashmir : दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सैन्याला मोठं यश मिळालं आहे. ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत शोपियानमध्ये (Shopiana) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर जवानांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर शोधमोहीम सुरू होती. त्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामुळेच 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमारच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राजस्थानचे रहिवासी असलेल्या विजय कुमार या बँक व्यवस्थापकाची बँकेतच गोळ्या झाडून हत्या केली होती. अखेर विजयच्या हत्येचा बदला घेण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.
#UPDATE | Two terrorists linked with proscribed terror outfit LeT were killed in the encounter. Identification is being ascertained. Further details shall follow: Police
— ANI (@ANI) June 14, 2022
कुलगाम जिल्ह्यातील बँकेचे मॅनेजर विजय कुमार यांची काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. विजयकुमार यांच्या हत्येनंतर अस्वस्थ झालेल्या काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. शोपियान जिल्ह्यातील परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर या भागाला वेढा दिला.
दहशतवाद्यांनी याच दरम्यान गोळीबार सुरू केला. जवानांनी देखील गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. हे दोघेही ‘लष्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे. याआधी देखील एका अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.