सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व नागरिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 03:39 PM2020-12-06T15:39:11+5:302020-12-06T15:40:33+5:30

Jammu and Kashmir: Terrorists attacked a joint party of Police and CRPF at Sazgaripora, Hawal in Srinagar : दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शाजगरियापोरा परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

jammu and kashmir terror attack on crpf and police team jawans and civilians injured | सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व नागरिक जखमी

सीआरपीएफ आणि पोलिसांवर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान व नागरिक जखमी

Next
ठळक मुद्देदहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी फारुख अहमद आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले.

जम्मू-काश्मीर : श्रीनगर परिसरात सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ही घटना श्रीनगरच्या शाजगरियापोरा परिसरात घडली आहे. या घटनेत एक पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, तर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शाजगरियापोरा परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला असून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफची संयुक्त टीम श्रीनगरमधील शाजगारियापोराजवळ गस्त घालत होती. यादरम्यान, याठिकाणी आधीपासून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी शाजगारियापोरा येथील नाक्यावर टीमवर गोळीबार सुरू केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पोलीस कर्मचारी फारुख अहमद आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

याचबरोबर, सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर घेरला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शाजगारियापोरा भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या परिसरा दहशतवादी अजूनही लपले आहेत, असे सांगण्यात येते. दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे हा हल्ला घडवून आणला, त्यावरून असे दिसते आहे की, दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षक हे गस्त घालण्यासाठी येणार आहेत, हे आधीच माहित होते. 

Web Title: jammu and kashmir terror attack on crpf and police team jawans and civilians injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.