काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 12:30 PM2018-06-21T12:30:01+5:302018-06-21T12:30:01+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील दहशतवादी लष्कराच्या निशानावर आहेत. दहशतवाद्यांची ही संख्या कमी नाही आहे. मात्र, काश्मीरच्या घाटीत लष्कराचे जवान तैनात असून ते दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी तयार असल्याचे एका लष्कराच्या अधिका-यांने सांगितले.
दहशतवाद्यांचा आकडा होता 250 पर्यंत...
सुत्रांच्या माहितीनुसार, 210 हा दहशतवाद्यांचा आकडा कमी नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी हा आकडा 250 इतका होता. सध्याच्या परिस्थितीत सक्रीय दहशतवाद्यांमध्ये 65 टक्के स्थानिक दहशतवादी आहेत. या व्यतिरिक्त बाहेरुन म्हणजेच पाकिस्तानमधून आलेले 35 टक्के दहशतवादी आहेत. यामध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत. सध्या हिजबुल मुजाहिद्दीनचे 62 ते 64 टक्के सक्रिय आहेत. तर लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे 35 टक्के दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. याशिवाय एजीयू आणि अलबदरचे काही दहशतवादी आहेत.
स्थानिक दहशतवाद्यांमध्ये वाढ...
सुरुवातीला स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण 60 टक्क्यापर्यंत होते, तर पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांचे 40 टक्के होते. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांचा लष्कारांकडून खात्मा करण्यात येत आहे. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये सध्या स्थानिक दहशतवाद्यांचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये जवळपास 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
श्रीनगरमधील परिस्थिती चिंताजनक...
श्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटना आधी घडत नव्हत्या. श्रीनगर दहशतवाद्यांसाठी राहण्यासाठी सोयीस्कर होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी श्रीनगर निशाण्यावर ठेवले आहे. याठिकाणी अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत. लष्कराचे जवान श्रीनगरमध्ये सर्च ऑपरेशन करत नाही, मात्र दहशतवाद्यांची माहिती मिळाल्यास सर्च ऑपरेशन केले जाते.