जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2017 01:40 PM2017-11-05T13:40:07+5:302017-11-05T13:40:42+5:30
काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे.
श्रीनगर: काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे. उरी सेक्टरमध्ये आज सकाळी सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले. सुरक्षा दलाकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
दहशतवाद्यांना उरीमध्ये झालेल्या चकमकीत ठार करण्यात आल्याच्या वृत्ताला लष्करातील एका अधिकाऱ्यानेही दुजोरा दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांविरोधात सीमा सुरक्षा दलाने अधिक वेगाने कारवाया सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जवानांनी सहा महिन्यात 80 अतिरेक्यांना ठार केलं आहे. दरम्यान, शनिवारी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी पुलवामा येथे राजपुरा पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला होता.