जम्मू-काश्मीरमध्ये पोटनिवडणुकीत हिंसाचार, 7 ठार 36 जखमी
By admin | Published: April 9, 2017 10:10 PM2017-04-09T22:10:56+5:302017-04-09T22:10:56+5:30
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान हिसाचार उफाळला. या हिसाचारात सात जण ठार झाले असून जवळपास 36 जण
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 9 - जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान हिसाचार उफाळला. या हिसाचारात सात जण ठार झाले असून जवळपास 36 जण जखमी झाले आहेत.जखमींमध्ये निवडणूक केंद्रावर तैनात अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. या घटनेनंतर फुटीरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांचा बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.
येथील बडगाम जिल्ह्यातील मतदान केंद्रावर जमावाने हल्ला चढवला होता, जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षादलाच्या जवानांना गोळीबार करावा लागला. बडगाम जिल्ह्याच्या चरार-ए-शरिफच्या जवळच असलेल्या पाखरपूरा येथे शेकडो आंदोलकांनी एका मतदान केंद्रावर हल्ला चढवल्यानंतर आंदोलकांवर बीएसएफने फायरिंग केली. जमावाने मतदान केंद्र असलेल्या इमारतीत घुसून तोडफोड केली. काही आंदोलकांनी बसेसची जाळपोळ केली. तर अनेक मतदान केंद्रांमधील ईव्हीएम मशीनही फोडल्या.
पोटनिवडणुकीकडे नागरिकांनी पाठ फिरवून फक्त 6.5 टक्के मतदान इतका अत्यल्प प्रतिसाद दिला आहे. गेल्या 30 वर्षांतील हे सर्वात कमी मतदान आहे.