Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 09:02 AM2019-09-22T09:02:45+5:302019-09-22T09:20:09+5:30

गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jammu And KashmirJammu And Kashmir 60 foreign militants infiltrated into J&K, says State police chief | Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

Jammu And Kashmir : तब्बल 60 विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. श्रीनगर आणि आसपासच्या परिसरात जवळपास 24 दहशतवादी दिसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता गेल्या महिनाभरात तब्बल 60 विदेशी दहशतवादीजम्मू-काश्मीरमध्ये घुसले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये 60 विदेशी दहशतवादी घुसले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी स्थानिक तरुणांचे दहशतवादी गटांमध्ये भरतीचे होण्याचे प्रमाण आतापर्यंत सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा केला आहे. गेल्या 45 दिवसांत फक्त दोन जण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लष्कर आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह अनेक यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानंतर घुसखोरी केलेल्या विदेशी दहशतवाद्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. तसेच काश्मीरमध्ये सुरक्षा दल सतर्क असून सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. श्रीनगर परिसरात अनेक ठिकाणी दहशतवादी आढळून आले आहेत. तसेच ते उघडपणे परिसरातील दुकानदारांना धमकी देत आहेत. त्यांना दुकाने बंद ठेवण्यास आणि त्यांचा आदेश पाळण्यास सांगत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Army Trooper Killed in Pakistan Firing Along LoC in Jammu and Kashmir

सीमावर्ती भागात पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरू आहे. दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसवण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार केला जात आहे. भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून दररोज सुरू आहे. या वर्षात पाकिस्तानने 2050 हून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यामध्ये 21 भारतीयांना प्राण गमवावा लागला. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याआधी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले होते. पाकिस्तानने आपल्या सुरक्षा दलांना शस्त्रसंधीचे पालन करण्याच्या सूचना द्याव्यात, असे भारताने प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. पाकिस्ताननं नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखावी, असे आवाहन भारताकडून करण्यात आले होते. भारताकडून पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसं उत्तर दिलं जात आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने होणारी घुसखोरी रोखण्याचे प्रयत्नदेखील सुरू आहेत. 

 

Web Title: Jammu And KashmirJammu And Kashmir 60 foreign militants infiltrated into J&K, says State police chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.