जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Published: February 14, 2017 08:31 PM2017-02-14T20:31:27+5:302017-02-14T20:35:55+5:30

जम्मू-काश्मीरमधील हांडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

Jammu and Kashmir's 3 terrorists dead | जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Next
ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 14 - जम्मू-काश्मीरमधील हांडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, हांडवारा परिसरात दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात जोरदार चकमक सुरू असून, यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास जवानांना यश आले आहे. तसेच, या चकमकीत एक सुरक्षा दलाचा जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  
दरम्यान, या परिसरात दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून सुरक्षा दलाचे सर्च ऑपरेशन सुरू आहे. 

Web Title: Jammu and Kashmir's 3 terrorists dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.