जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 10:30 PM2018-04-29T22:30:21+5:302018-04-29T22:46:15+5:30
जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कथुआ बलात्कार प्रकरणामध्ये भाजपाच्या काही मंत्र्यांनी आरोपींचे समर्थन करण्याची भूमिका घेतल्यानंतर जम्मू-काश्मीर सरकारमधील भाजपाच्या मंत्र्यांवर चौफेर टीका झाली होती. त्यानंतर सुरुवातीला दोन आणि त्यानंतर उर्वरित 9 अशा राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. दरम्यान, रविवारी रात्री उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही पदावरून पायऊतार होण्याचा निर्णय घेतला आहे. आता निर्मल सिंह यांच्या जागी कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
#JammuAndKashmir Deputy Chief Minister Nirmal Singh resigns pic.twitter.com/uMFj2kkVny
— ANI (@ANI) April 29, 2018
कविंद्र गुप्ता हे सध्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, सोमवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असून, अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान देण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार आहे.
Kavinder Gupta to be the new Deputy Chief Minister of #JammuAndKashmirpic.twitter.com/TnIe4FygAN
— ANI (@ANI) April 29, 2018