जम्मू काश्मीर : पुलवामा येथील खासगी शाळेत स्फोट, 10 विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 03:08 PM2019-02-13T15:08:33+5:302019-02-13T15:28:43+5:30
जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत स्फोट झाला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील एका खासगी शाळेत स्फोट झाला आहे. या स्फोटात 10विद्यार्थी जखमी झाले असून, जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कसा झाला, याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
स्पोटाची खबर मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसे संपूर्ण शाळा रिकामी करण्यात आली. स्फोट झाला तेव्हा शाळेमध्ये नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचे एक्स्ट्रा क्लास सुरू होते. दरम्यान, या स्फोटात जखमी झालेले विद्यार्थी दहावीतील होते, अशी माहिती समोर आली आहे.
Jammu and Kashmir: Explosion in a school in Pulwama. Injured students shifted to hospital. More details awaited pic.twitter.com/TFB550vvlR
— ANI (@ANI) February 13, 2019
Jammu and Kashmir: #Visuals from the hospital where students who have been injured in an explosion in a Pulwama school, are being treated. pic.twitter.com/xvJOBEuiF4
— ANI (@ANI) February 13, 2019