Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:39 PM2022-03-17T16:39:03+5:302022-03-17T16:39:31+5:30

Jammu-Kashmir:सीआरपीएफने नक्सलग्रस्त राज्यात विविध कारवायांमध्ये 19 माओवाद्यांचा खात्मा केला तर 699 जणांना अटक केली.

Jammu-Kashmir: 175 terrorists killed in Jammu-Kashmir last year, 183 captured alive | Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

Jammu-Kashmir: गेल्या वर्षभरात काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा, 183 जणांना जिवंत पकडण्यात यश

Next

नवी दिल्ली: 1 मार्च 2021 ते 16 मार्च 2022 दरम्यान केंद्रीय राखीव पोलिस दलाने (CRPF) जम्मू आणि काश्मीरमध्ये 175 दहशतवाद्यांचा खात्मा केला, तर 183 दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याच काळात सीआरपीएफने अतिरेकी नक्सलग्रस्त राज्यांमध्ये झालेल्या विविध कारवायांमध्ये 19 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आणि 699 जणांना अटक केली.

सीआरपीएफ शनिवारी जम्मूमधील एमए स्टेडियमवर आपल्या 83व्या स्थापना दिनानिमित्त परेड आयोजित करेल. दिल्ली-NCR बाहेर CRPF आपला स्थापना दिवस साजरा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंग म्हणाले की, सध्या जम्मू-काश्मीरमधील वातावरण चांगले आहे. येत्या काळात यात आणखी सुधारणा होईल. ते म्हणाले, “केंद्र सरकारने सशस्त्र दलांना त्यांच्या स्थापना दिनानिमित्त देशात विविध ठिकाणी परेड आयोजित करून लोकांसमोर ताकद दाखवण्याचे निर्देश दिले आहेत. हे जवानांसाठी तसेच सामान्य लोकांसाठी, विशेषत: तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल. हे राष्ट्रीय एकात्मतेला देखील मदत करेल."

एएनआयने कुलदीप सिंगच्या हवाल्याने म्हटले की, “सीआरपीएफ देशातील विविध श्रेणीतील 117 लोकांना सुरक्षा कवच देत आहे. व्हीआयपी सुरक्षा शाखेत बत्तीस महिला कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 5 राज्यांमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण 41 व्हीआयपींना सीआरपीएफने सुरक्षा पुरवली होती. यापैकी 27 जणांची सुरक्षा निवडणुकीनंतर काढून घेण्यात आली आहे.

दगडफेकीच्या घटना घटल्या
काही दिवसांपूर्वी झालेल्या सीआरपीएफ जवानाच्या हत्येबाबत विचारले असता ते म्हणाले की, या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत कमीत कमी वेळात गुन्हेगाराला अटक केली. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीवर बोलताना CRPF DG कुलदीप सिंह म्हणाले, कलम 370 रद्द केल्यापासून दगडफेकीच्या घटना जवळपास शून्य झाल्या आहेत. विदेशी दहशतवाद्यांची घुसखोरी आणि हल्ले यातही घट झाली आहे.

Web Title: Jammu-Kashmir: 175 terrorists killed in Jammu-Kashmir last year, 183 captured alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.