Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 08:06 AM2020-04-25T08:06:00+5:302020-04-25T08:08:02+5:30
Jammu And Kashmir : परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
श्रीनगर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरामध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील गोरीपोरा परिसरामध्ये शनिवारी ( 25 एप्रिल) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
#WATCH Jammu and Kashmir: 2 terrorists & 1 terrorist associate killed in an encounter with security forces at Goripora Area of Awantipora in Pulwama district. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/bY41lkwcFp
— ANI (@ANI) April 25, 2020
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील मेलहूरा परिसरामध्ये बुधवारी ( 22 एप्रिल) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तसेच काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याला काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते. अवघ्या 24 तासांत सैन्याने हे मोठं यश मिळवले होते. मात्र या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले होते. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. अशा एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.
#UPDATE: 2 unidentified terrorists and 1 hardcore associate of terrorists killed. Search is still going on. Details shall follow: Jammu & Kashmir Police https://t.co/3j2aJFcfGQ
— ANI (@ANI) April 25, 2020
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: पावसाळ्यात कोविड-१९ ची दुसरी लाट येणार?
CoronaVirus: कोरोना लस येण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार?