Jammu & kashmir : काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 13:24 IST2021-10-11T13:23:43+5:302021-10-11T13:24:19+5:30
सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला.

Jammu & kashmir : काश्मीर खोऱ्यात मोठा दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत 5 जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात सैन्य दलाचे 4 जवान आणि जेसीओचा 1 जवान शहीद झाला आहे. चकमकीत हे पाचही जवान गंभीर जखमी झाले होते. मात्र, त्यानंतर, काही तासांनी त्यांना वीरमरण प्राप्त झालं.
सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. या कारवायांना भारतीय सैन्य दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, आज पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यामध्ये, 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. पूँछ जिल्ह्यातील चमरेर याठिकाणी जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा जवानांनी मोहीम आखून या दहशतवाद्यांना गाठलं. चमरेर येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला होता.
दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली, त्यामध्ये 5 जवान शहीद झाले असून दोन आतकंवाद्यांना कंठस्नान घालण्यात आल्याची प्राथमिक आहे.