Jammu-Kashmir: पुंछमध्ये 5 दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकीत 2 JCO सह 7 जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:40 AM2021-10-15T08:40:23+5:302021-10-15T08:40:31+5:30
Poonch encounter: चकमकीच्या पार्श्वभूमीवर राजौरी-पुंछ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
पुंछ: जम्मूचा सीमावर्ती जिल्हा पुंछच्या मेंढर भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आज एक जुनिअर कमिशन्ड ऑफीसर(JOC) आणि एक जवान शहीद झाले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक गुरुवारी रात्रीपर्यंत सुरू होती. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबला आहे आणि जम्मू-पुंछ महामार्गावरील हालचाल बंद करण्यात आली आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन जवान शहीद झाले आहेत. तर एक जण जखमी आहे. पुंछमध्ये, 5 जवानांसह 5 दिवस सुरू असलेल्या चकमकीत 7 जवान शहीद झाले आहेत, ज्यात दोन जेसीओ आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी झालेल्या चकमकीत 1 सैनिक शहीद झाला, तर 2 जखमी झाले. पण, उपचारादरम्यानर जखमींपैकी एका सैनिकाचा मृत्यू झाला. अशा प्रकारे एकूण 2 सैनिक शहीद झाले आहेत.
दहशतवादी त्याच गटातील असू शकतात, ज्यांच्यासोबत सोमवारी झालेल्या चकमकीत लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. गुरुवारी शहीद झालेल्या सैनिकांची ओळख अद्याप पटलेली नाही.
चकमकीच्या पार्श्वभूमीवर, राजौरी-पुंछ राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षा दलाच्या काही तुकड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती की दहशतवाद्यांची संख्या चार-पाच असू शकते. ते ऑगस्टमध्ये घुसखोरी करणाऱ्या त्याच गटाचा भाग असू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, शोपियांकडे जाताना पोलीस आणि सुरक्षा दलाने त्यांना रोखले होते. 6 ऑगस्ट रोजी दोन दहशतवादी ठार झाले. तर, जवानांनी 19 ऑगस्ट रोजी आणखी एका दहशतवाद्याला ठार केले होते.