Jammu-Kashmir: एका वर्षानंतर सापडला अपहरण झालेल्या सैनिकाचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 08:59 PM2021-09-22T20:59:06+5:302021-09-22T21:02:56+5:30
मृत शाकीर मंजूर यांचे वडील मंजूर अहमद यांना अपहरणाच्या काही दिवसानंतर रक्ताने माखलेले मुलाचे कपडे सापडले होते.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील कुलगाम गावात मंगळवारी सकाळी एक छिन्न-विछिन्न अवस्थेत मृतदेह सापडला. आता हा मृतदेह भारतीय सैन्यातील रायफलमन शाकीर मंजूर यांचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. लष्करातील जवान शाकीर गेल्या वर्षी 2 ऑगस्टपासून बेपत्ता होते. शोपियां जिल्ह्यात दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केलं होतं.
तुमच्याकडे फाटलेल्या, जळालेल्या किंवा रंग लागलेल्या नोटा आहेत ? अशाप्रकारे घ्या बदलून...
शाकीर मंजूर यांचे वडील मंजूर अहमद यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं की, तो मृतदेह माझ्याच मुलाचा आहे. त्याचे पाय, डोक्याचे केस आणि हातातील ब्रासलेटवरुन मी त्याला ओळखू शकतो. दरम्यान, पोलिसांनी डीएनए चाचणीसह फॉरेन्सिक तपासणी करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या ६ सरकारी कर्मचाऱ्यांना हाकललं; जम्मू काश्मीर सरकारची कारवाईhttps://t.co/OoeHa1v19H
— Lokmat (@MiLOKMAT) September 22, 2021
वर्षभरापासून सुरू होता मुलाचा शोध
मंजूर अहमद यांना शाकीर यांच्या अपहरणानंतर काही दिवसांनी मुलाचे रक्ताने माखलेले कपडे मिळाले होते. त्यानंतर गेल्या एक वर्षापासून दररोज ते आपल्या मुलाचा शोध घेत होते. शाकीर मंजूर यांच्या शोधासाठी सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नसल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.