Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 04:32 PM2021-08-05T16:32:20+5:302021-08-05T16:32:37+5:30

Jammu-Kashmir: आजच्याच दिवशी दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवली होती.

Jammu-Kashmir: Bomb blasts and shootings in downtown Srinagar, no casualties | Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात बॉम्ब स्फोट आणि गोळीबार

Next
ठळक मुद्दे मागील दोन वर्षात 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवादी ठार

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द करुन आज 2 वर्षे पूर्ण होत आहे. पण, आजच्या दिवशी श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात मोठा ब्लास्ट आणि गोळीबार करण्यात आला आहे. डाउनटाउन परिसरातील जामा मशिदीजवळ हा ब्लास्ट झाला. सुदैवाने या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सध्या पोलिस या हल्ल्यामागील सुत्रधाराचा शोध घेत आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा कमी तीव्रतेचा आयईडी ब्लास्ट होता. यानंतर दहशतवाद्यांनी हँड ग्रेनेट फेकत गोळीबारही केला. या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी दहशवाद्यांनी सोपोरच्या मुख्य चौकात गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगिल्यानुसार, दहशतवाद्यांनी पोलिसांवरही दुरून गोळीबार केला, पण कुणालाही गोळी लागली नाही.

दोन वर्षात 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवादी ठार
पाच ऑगस्ट 2019 ला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटलवल्यानंतर दररोज दहशतवाद्यांसाठी काळा दिवस ठरत आहे. मागच्या दोन वर्षात जम्मू-काश्मीरमध्ये 130 टॉप कमांडर्ससह 459 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. तसेच, 149 दहशतवाद्यांनी आत्मसमर्पणही केले आहे.

Web Title: Jammu-Kashmir: Bomb blasts and shootings in downtown Srinagar, no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.