जम्मू काश्मीरमध्ये बीएसएफने एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान
By admin | Published: February 21, 2017 11:56 AM2017-02-21T11:56:41+5:302017-02-21T11:56:41+5:30
जम्मू काश्मीरमधील राजौरीतील केरी सेक्टरमध्ये सोमवारी रात्री बीएसएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी बीएसएफच्या 163 बटालियनने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 21 - जम्मू काश्मीरमधील राजौरीतील केरी सेक्टरमध्ये सोमवारी रात्री बीएसएफचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी बीएसएफच्या 163 बटालियनने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. दरम्यान, दोन दहशतवाद्यांना पलायन करण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीच्या केरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील कुंपणाजवळ तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांना संशयित हालचाली आढळून आल्या. यानंतर मध्यरात्रीच चकमकीला सुरुवात झाली. जवळपास 30 मिनिटे सुरू असलेल्या या चकमकीनंतर दहशतवाद्यांच्या बाजूनं सुरू असलेला गोळीबार थांबला.
जवानांनी परिसरात केलेल्या शोधमोहीमेदरम्यान एका दहशतवाद्याचा मृतदेह आढळला. सोबत एक एके-47, सुकामेवा, फळं आणि अंधरात दिसण्यासाठी मदत करणारे एक यंत्रही सापडले आहे.
बीएसएफ अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. याचवेळी अन्य दोन दहशतवादी डोंगराळ भाग आणि जंगलाचा फायदा घेत फरार झाले आहेत.
#UPDTE: BSF foiled Infiltration bid & killed 1 terrorist in Keri Sector, Rajouri (J&K); 1 AK-47 Rifle recovered among other paraphernalia.
— ANI (@ANI_news) February 21, 2017