Jammu Kashmir : रजेवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 09:19 AM2018-07-30T09:19:57+5:302018-07-30T10:38:54+5:30

दहशतवाद्यांकडून वारंवार जवान आणि पोलिसांना टार्गेट करण्यात येत आहे.

JAMMU KASHMIR : CRPF Trooper on Leave Attacked by Militants, Dies in Pulwama | Jammu Kashmir : रजेवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

Jammu Kashmir : रजेवर असलेल्या जवानाची दहशतवाद्यांनी केली हत्या

Next

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांची हत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दहशतवाद्यांकडून वारंवार जवान आणि पोलिसांना टार्गेट करण्यात येत आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रविवारीदेखील (29 जुलै) सीआरपीएफचे जवान नसीर अहमद राठेर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

दहशतवाद्यांनी नसीर अहमद राठेर यांच्यावर पुलवामा येथील निवासस्थानी हल्ला केला. नसीर अहमद राठेर सीआरपीएफच्या 134व्या बटालियनचे जवान होते. सुट्टीवर असताना दहशतवाद्यांनी राठेर यांची गोळ्या झाडून हत्या केली. दरम्यान, घटनेनंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




 

Web Title: JAMMU KASHMIR : CRPF Trooper on Leave Attacked by Militants, Dies in Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.