भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 06:45 PM2024-09-20T18:45:22+5:302024-09-20T18:45:55+5:30

Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीरमधून कलम-370 हटवल्यानंतर वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे.

Jammu Kashmir Election 2024 : Vaishnodevi's seat became prestigious for BJP | भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...

Jammu Kashmir Election 2024 :जम्मू-काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणुका होत आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपचे माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे ही जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी मतदारसंघात यायचा. या जागेवर भाजप आणि काँग्रेसनी आपली पूर्ण ताकद लावली आहे. हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असल्याने भाजपसाठी ही जागा महत्त्वाची आहे. अयोध्या आणि बद्रीनाथसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी भाजपने जास्त जोर लावला आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अयोध्या आणि नाशिकसारख्या धार्मिक शहरांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. एवढंच नाही तर उत्तराखंडमधील बद्रीनाथ आणि हरिद्वारच्या येथील पोटनिवडणुकीतही भाजपचा पराभव झाला. एवढंच नाही तर प्रयागराज आणि चित्रकूटसारख्या लोकसभेच्या जागा भाजपने गमावल्या होत्या. यातील अयोध्येचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला. त्यामुळेच भाजप कोणत्याही परिस्थितीत श्री माता वैष्णोदेवीची जागा गमवायची नाही.

2008 आणि 2014 मध्ये भाजपने विजय मिळवला 
जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर झालेल्या परिसीमनामुळे माता वैष्णोदेवी विधानसभा जागा अस्तित्वात आली आहे. पूर्वी हा भाग रियासी सीटच्या अंतर्गत येत होता. 2008 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करून भाजपने आपली पकड निर्माण केली होती. त्यानंतर 2014 मध्येही भाजपला यश मिळाले होते. गेल्या 16 वर्षांपासून भाजपचे येथे वर्चस्व राहिले आहे. हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी भाजपने बलदेवराज शर्मा यांना जबाबदारी दिली आहे, तर काँग्रेसने भूपेंद्र जामवाल यांना रिंगणात उतरवून लढत रंजक बनवली आहे.

भाजपसाठी सर्वात मोठा ताण
भाजपसाठी सर्वात मोठे टेन्शन वैष्णोदेवीतील शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीचे आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उधमपूरमध्ये आयोजित सभेत बारीदारांना हक्क मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. फैजाबाद (अयोध्या) लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे शहरातील विकासकामांसाठी पाडण्यात आलेल्या मोठ्या प्रमाणात घरे आणि जमिनींचा योग्य मोबदला न मिळणे. त्यामुळे अयोध्येतील जनतेने भाजपच्या विरोधात मतदान केल्याचे मानले जात आहे. श्री माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघातही अशीच स्थिती दिसून येत आहे. शेतकरी संतप्त असून अनेक दिवसांपासून आपल्या हक्काची मागणी करत आहेत.

माता वैष्णोदेवी विधानसभा मतदारसंघात एकूण 74 हजार मतदार आहेत. त्यापैकी सुमारे 15 हजार शेतकरी आहेत. बरिदार संघर्ष समितीचे अध्यक्ष श्याम सिंह माता वैष्णोदेवी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंजक बनली आहे. मतांमध्ये फूट पडली तर भाजपला ही जागा जिंकणे सोपे जाणार नाही. इथे नेमका काय निकाल लागणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: Jammu Kashmir Election 2024 : Vaishnodevi's seat became prestigious for BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.