Jammu and Kashmir : नौगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, इंटरनेट सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 07:49 AM2018-10-24T07:49:21+5:302018-10-24T08:34:43+5:30
जम्मू-काश्मीरमधील नौगाममध्ये बुधवारी (24 ऑक्टोबर) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील नौगाममध्ये बुधवारी (24 ऑक्टोबर) जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. चकमकीदरम्यान सुथू आणि नौगामच्या आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
#JammuAndKashmir: Bodies of two terrorists recovered following an exchange of fire between terrorists & security forces at Soothu, Nowgam on the outskirts of Srinagar. pic.twitter.com/lv9cqkOjNZ
— ANI (@ANI) October 24, 2018
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. नौगाममध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. खबरदारीचा उपाय म्हणून या भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.
#JammuAndKashmir: An exchange of fire started between terrorists & security forces at Soothu, Nowgam on the outskirts of Srinagar earlier this morning. Internet services have been suspended. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/tMIUg9cfmp
— ANI (@ANI) October 24, 2018
रविवारी कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.