जम्मू-काश्मीरच्या पठाणकोट रस्त्यावर अपघात! ट्रॅक्स दरीत कोसळली, पाच जणांचा जागीच मृत्यू, १२ गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 08:50 PM2023-06-27T20:50:04+5:302023-06-27T20:50:35+5:30
ट्रॅक्स खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला.
जम्मू-काश्मीरमधील बडेरवाह पठाणकोट रस्त्यावर मंगळवारी एक ट्रॅक्स वाहन खोल दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोडा उपायुक्त विशेष पॉल महाजन यांनी ही माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आरोपानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
एसएसपी डोडा अब्दुल कयूम यांनी सांगितले की, पाच जणांना मृत घोषित करण्यात आले, तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अपघातासंदर्भात पुढील तपास सुरू आहे.
आणखी एक अपघात डोडा जिल्ह्यातील भल्ला भागात झाला, येथेही खोल दरीत वाहन पडल्याने जावेद अहमद नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले.
तिसरी घटना रामबन जिल्ह्यात घडली. येथे रामपरीजवळ जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर एक कार रस्त्यावरून घसरली आणि २०० मीटर खोल दरीत पडली. ज्यामध्ये मोहम्मद अफजल आणि मोहम्मद अजमत या दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. या अपघातात शब्बीर अहमद मलिक हा गंभीर जखमी झाला आहे. बचाव पथकाने त्याला रुग्णालयात पाठवले आहे.
दुसरीकडे, बिहारच्या बेगुसरायमध्ये एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्याचवेळी एकाच कुटुंबातील अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. बेगुसराय सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.