"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 04:16 PM2021-04-09T16:16:46+5:302021-04-09T16:18:55+5:30

Coronavirus : ओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण.

jammu kashmir former cm Omar Abdulla tasted coronavirus positive tweeted home quarantine | "वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

"वर्षभर चकवा दिला पण..."; ओमर अब्दुल्लांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देओमर अब्दुल्लांनी ट्वीट करत दिली माहिती.काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनाही झाली होती कोरोनाची लागण.

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अभिनेते, बड्या व्यक्ती, राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान, त्यांच्यावरील उपचार केल्यानंतर नुकतंच त्यांना घरी सोडण्यात आलं. परंतु आता त्यांचे सुपुत्र आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली. तसंच आपण होम क्वारंटाईन झालो असल्याची माहितीही त्यांनी दिली.

"वर्षभर मी करोनाला चकवा दिला. अखेर त्यानं मला हेरलंच. माझी करोनाची चाचणी सकारात्मक आली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षण दिसत नाही. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यामुसार मी होम क्वारंटाईन झालो आहे. तसंच सतत ऑक्सिजनची पातळी आणि अन्य आवश्यक बाबींवर लक्ष ठेवून आहे," असं त्यांनी नमूद केलं. 



फारूख अब्दुल्लांनाही झाली होती कोरोनाची लागण

यापूर्वी फारूख अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दोन दिवसांपूर्वीच उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

Web Title: jammu kashmir former cm Omar Abdulla tasted coronavirus positive tweeted home quarantine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.