Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:54 AM2020-06-08T10:54:33+5:302020-06-08T10:57:13+5:30
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.
श्रीनगर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं.
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील पिंजोरा परिसरामध्ये सोमवारी ( 8 जून) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
#UPDATE Jammu & Kashmir: Bodies of the four terrorists who were killed in the encounter in Pinjora area of Shopian district today, have been recovered. Arms & ammunition also recovered. Operation has concluded. https://t.co/7BxzFHeIHd
— ANI (@ANI) June 8, 2020
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत मोठी चकमक झाली होती. जवानांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू असलेला गोळीबार काही वेळासाठी थांबा होता. मात्र तो पुन्हा सुरू झाला. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली. यामध्ये 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले होते.
Today's Fuel Price: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दरhttps://t.co/dAqpG3LgQS#Fuel#petrolprices#diesel
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2020
CoronaVirus News : कशी तयार केली खास मिठाई? आणि काय आहेत फायदे?, जाणून घ्याhttps://t.co/YLNfbMUZhm#CoronavirusInIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronaUpdate
— Lokmat (@MiLOKMAT) June 8, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!
CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध
मद्यप्रेमींसाठी खूशखबर! दारू स्वस्त होणार, 'कोरोना शुल्क' हटवणार; 'या' सरकारने घेतला निर्णय
30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान