गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 03:36 PM2022-03-21T15:36:50+5:302022-03-21T15:37:25+5:30
राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य.
Jammu and Kashmir News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. रविवारी जम्मू काश्मीरमध्ये बोलताना त्यांनी असे संकेत दिले. आपल्याला समजात बदल घडवायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. "कधी कधी मी विचार करतो, अचानक एका दिवशी तुम्हाला समजेल की मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे आणि समाज सेवा करायला सुरूवात केली आहे," असं त्यांनी नमूद केल.
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर जी २३ गटाचे मुख्य सदस्य गुलाम नबी आझाद हे सातत्यानं चर्चेत आहेत. यापूर्वी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. तसंच त्यांची भेट घेणं ही काही बातमी नसून आपण सातत्यानं त्यांची भेट घेत अल्याचंही ते म्हणाले होते.
याशिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं होतं. जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा पक्षाचे कार्यकर्तेच नवा अध्यक्ष कोण हे ठरवतील, असं ते म्हणाले. "राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही. नागरिकांनी समाजासोबत राहायला हवं," असंही आझाद म्हणाले. आपण सर्व एकत्र राहूनही ते काम करू शकतो. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं काय आपलं काम नाही का? असा सवालही त्यांनी केला.
#WATCH | "...We have to bring about a change in society. Sometimes I think, and it is not a big deal that suddenly you come to know that I have retired and started doing social service...," Senior Congress leader Ghulam Nabi Azad said at an event in Jammu (20.03) pic.twitter.com/eCw8GR0NEm
— ANI (@ANI) March 21, 2022
महात्मा गांधींचाही उल्लेख
यावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते यावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं. तसंच आझाद यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरही भाष्य केलं. "जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे, त्याचा परिणाम हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रा सर्वांवर झाला आहे," असं त्यांनी नमूद केलं.