Jammu-Kashmir: सरकारचा मोठा निर्णय; टार्गेट किलिंगदरम्यान सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 06:48 PM2022-06-01T18:48:59+5:302022-06-01T18:52:19+5:30

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगदरम्यान उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्याचा निर्णय घेतला आहे.

Jammu-Kashmir: Government's big decision; all Hindu employees will be transferred to the district headquarters | Jammu-Kashmir: सरकारचा मोठा निर्णय; टार्गेट किलिंगदरम्यान सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली

Jammu-Kashmir: सरकारचा मोठा निर्णय; टार्गेट किलिंगदरम्यान सर्व हिंदू कर्मचाऱ्यांची जिल्हा मुख्यालयात बदली

googlenewsNext

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता हिंदू सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्ह्याच्या ठिकाणी होणार आहेत. दुर्गम भागात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना काश्मीरच्या जिल्हा मुख्यालयात आणण्याची तयारी सुरू आहे. 

बदलीसह सुरक्षित निवास मिळणार
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एक महत्त्वाची बैठक घेतली होती, ज्यामध्ये खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवर चर्चा करण्यात आली. त्या चर्चेनंतर असे ठरले की, जे हिंदू कर्मचारी सध्या दूरवरच्या भागात कार्यरत आहेत, त्यांची बदली केली जाईल. त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन प्रशासन या सर्वांना जिल्हा मुख्यालयात आणणार आहे. त्या सर्व हिंदू कर्मचाऱ्यांना सुरक्षित निवास व्यवस्था देण्याची जबाबदारीही प्रशासनावर राहील, असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. अशा स्थितीत त्यांची केवळ बदलीच होत नाही, तर त्यांना सुरक्षित निवासाची हमीही दिली जात आहे.

काश्मिरी हिंदूंच्या हत्या
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगचे प्रमाण वाढले असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी सातत्याने काश्मिरी पंडितांना लक्ष्य करत आहेत. सरकारी अधिकारी राहुल भट्ट यांच्या हत्येने सुरू झालेला खेळ अजून संपलेला नाही. अशा परिस्थितीत त्यांची जम्मूला बदली करावी, या मागणीसाठी खोऱ्यातील काश्मिरी पंडितांकडून सातत्याने आंदोलन सुरू आहे. आता याच मागणीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काश्मीरमध्ये काम करणाऱ्या सरकारी हिंदू कर्मचाऱ्यांना हा दिलासा दिला आहे.

हिंदू कर्मचारी निर्णयावर नाराज
हिंदू कर्मचारी या निर्णयावर समाधानी नाहीत. त्यांना जम्मूमध्येच बदली हवी आहे. त्यांना घाटीत काम करायचे नाही. मोदी सरकार त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही ते करत आहेत. मात्र काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन सरकार सातत्याने देत आहे. हिंदू कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णयही याच दिशेने उचललेले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या काही महिन्यात अनेक दहशतवादी ठार
खोऱ्यात काश्मिरी पंडितांवर हल्ले वाढले असल्याने प्रशासनानेही हा निर्णय घेतला आहे. राहुल भट्टशिवाय शिक्षिका रजनी बाला यांचीही हत्या करण्यात आली आहे. दहशतवादी सरपंच आणि मजुरांनाही गोळ्या घालून ठार करत आहेत. घाटीचे वातावरण बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मात्र ऑपरेशन ऑल आऊटच्या माध्यमातून भारतीय जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. यावर्षी मे महिन्यापर्यंत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.

Web Title: Jammu-Kashmir: Government's big decision; all Hindu employees will be transferred to the district headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.