काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 09:09 AM2020-05-03T09:09:02+5:302020-05-03T09:14:52+5:30

हंदवाड्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jammu Kashmir Handwara Encounter 4 Indian Army Personnel 1 police Martyred Two Terrorists Killed kkg | काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार

काश्मीरच्या हंदवाडामध्ये लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच जण शहीद; दोन दहशतवादी ठार

Next

हंदवाडा: जम्मू काश्मीरमधील हंदवाड्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना लष्कराच्या पाच जणांसह जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक जण शहीद झाला आहे. दहशतावाद्यांचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेल्या पाच जणांमध्ये लष्करातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं आहे. कालपासून हंदवाड्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सध्या या ठिकाणी गोळीबार थांबला आहे. मात्र लष्कराची कारवाई सुरू आहे.




हंदवाड्यातील एका घरात दोन परदेशी दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर दहशतवादी लपलेलं घर जवानांनी स्फोटकांनी उडवून दिलं. या स्फोटानंतर संपूर्ण घराला आग लागली. जवानांकडून सध्या ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे. याशिवाय या भागात लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे. संपूर्ण परिसर लष्करानं सील केला आहे. वाहतूक थांबवण्यात आली आहे. 







गेल्या दोन दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांनी जोर धरला आहे. याशिवाय पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करून गोळीबार केला जात आहे. याआधी पुलवामाच्या डांगरपोरामध्ये सुरक्षा दलांना सकाळी सहा वाजता दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्करानं सर्च ऑपरेशन सुरू केलं. जवानांकडून घेरले जाताच दहशतवाद्यांनी गोळीबार करत पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

मुंबईची आरोग्य यंत्रणा राज्य शासनाने ताब्यात घ्यावी; भाजपा आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

लॉकडाऊनच्या वाढीव कालावधीसाठी राज्य शासनामार्फत मार्गदर्शक सूचना जारी

महाराष्ट्राची मागणी धुडकावून वित्तीय सेंटर गुजरातमध्ये; सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली

Web Title: Jammu Kashmir Handwara Encounter 4 Indian Army Personnel 1 police Martyred Two Terrorists Killed kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.