जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 12:35 PM2018-07-05T12:35:03+5:302018-07-05T12:39:55+5:30
अतिवृष्टी आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे आणि खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा काही काळासाठी पुन्हा एकदा थांबवण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये पाठवण्यात आलं आहे.
Heavy rain continues to lash Jammu & Kashmir's Srinagar. #AmarnathYatra is currently halted along both Baltal and Pahalgam routes due to heavy rainfall in the region. pic.twitter.com/xlpxuWDL7F
— ANI (@ANI) July 5, 2018
अमरनाथच्या यात्रेदरम्यान बालटाल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे आता खबरदारी म्हणून पुन्हा एकदा पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्प येथे लष्कराकडून यात्रा थांबवण्यात आली आहे. यापूर्वीही बालटालला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना 28 जूनला बालटाल बेस कॅम्पजवळ थांबवण्यात आले होते.
11 भाविकांचा झाला मृत्यू
अमरनाथ गुफा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यंदा यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्युमुखी पडले आहेत.