Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:56 PM2022-07-10T21:56:09+5:302022-07-10T21:56:36+5:30

Jammu Kashmir: दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमधील 700 तरुणांची भरती केली असून, सध्या घाटीत 141 सक्रिय दहशतवादी आहेत.

Jammu-Kashmir: In the last four years, 700 youths from Jammu and Kashmir have joined terrorist organizations | Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

Jammu-Kashmir: गेल्या चार वर्षात जम्मू-काश्मीरमधील 700 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील

googlenewsNext

Jammu Kashmir Terrorist: दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 तरुणांची भरती केल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, जम्मू-काश्मीरात 141 सक्रिय दहशतवादी असून, त्यापैकी बहुतेकजण परदेशी आहेत, अशीही माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानच्या बाजूने घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत.

या संघटनांचे दहशतवादी
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 82 विदेशी दहशतवादी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रिय होते. या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा आणि संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत.

विविध दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत J&K मध्ये 700 स्थानिक तरुणांची भरती केली आहे, त्यापैकी 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181 आणि 2021 मध्ये 142 तरुणांची भरती करण्यात आली होती. या वर्षी जून अखेरपर्यंत 69 तरुणांची दहशतवादी संघटनांनी भरती केली आहे.

125 दहशतवादी ठार
सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना ठार केले आहे. तसेच, दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 23 जण जखमी झाले आहेत. या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 20 नागरिकांचाही बळी गेलाय. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 146 दहशतवादी आणि 41 नागरिकांचा मृत्यू झाला आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला. 

Web Title: Jammu-Kashmir: In the last four years, 700 youths from Jammu and Kashmir have joined terrorist organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.