कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:32 PM2023-01-11T19:32:37+5:302023-01-11T19:40:13+5:30
जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे.
भारतीय सैन्याच्या जवानांनी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. लष्कराने माहिती दिली की, डॅगर विभागाच्या जवानांनी बुनियार तहसीलच्या दुर्गम सुमवली गावातील गुलशन बेगम या महिलेला गावापासून 20 किमी अंतरावर असलेल्या जवळच्या प्राथमिक आरोग्य सेवा (PHC) केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत केली.
"महिलेला सैनिकांनी सुमवली गावापासून पारो डिटेचमेंटपर्यंत पायी येत बाहेर काढले आहे. त्यानंतर सैन्याच्या वैद्यकीय पथकाने महिलेची आवश्यक तपासणी केली" अशी माहिती दिली आहे. महिलेला ताबडतोब रुग्णवाहिकेत हलवण्यात आले आणि बर्फाच्छादित रस्त्यांवरून वाट काढत बोनियार पीएचसीमध्ये नेण्यात आले.
गेल्या वर्षी 25 नोव्हेंबर रोजी लष्कराने नियंत्रण रेषेजवळील सुमवाली गावातून एका गर्भवती महिलेला सुरक्षितरित्या बाहेक काढलं होतं. 30 वर्षीय अतारा यांच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या, त्यानंतर स्थानिकांनी फोन करून अधिकाऱ्यांना वैद्यकीय मदत देण्याचे आवाहन केले.
सैन्याने म्हटले होते की, "24 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता, नाला येथील भारतीय लष्कराच्या चौकीला स्थानिक लोकांकडून गर्भवती अतारा (30 वर्षे) यांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याची विनंती करण्यात आली. महिलेच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. नाला चौकी येथील लष्कराच्या वैद्यकीय पथकाने आवश्यक बाबी तपासल्या आणि महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढण्याची योजना आखली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"