तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 09:25 AM2018-05-24T09:25:29+5:302018-05-24T09:25:29+5:30

एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे.

jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar | तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

श्रीनगर- गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दगडफेकीच्या घटनेवेळी एका स्थानिक तरूणाला जीपला बांधणारे मेजर लीतुल गोगोई वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. गोगोईंसोबत आलेल्या तरुणीला हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याने गोगोई यांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि हे प्रकरण शेवटी पोलिसांकडे पोहोचलं. या प्रकरणी मेजर गोगोई यांची चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर त्यांना परत पाठविण्यात आलं. 

मेजर लीतुल गोगोई यांनी श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये रुम बुक केली होती. बुधवारी गोगोई हे हॉटेलमध्ये चेक- इन करत असताना त्यांचासोबत एक तरुणी होती. हॉटेल कर्मचाऱ्यांना ती तरुणी अल्पवयीन असल्याचा संशय आला. कर्मचाऱ्यांनी तरूणीचं ओळख पत्र तपासलं असता ती बडगामची रहिवासी असल्याचं समोर आलं. हॉटेलमध्ये स्थानिक तरुणींना प्रवेश दिला जाणार नाही, असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी गोगोई यांना सांगितलं. यावरुन गोगोई आणि हॉटेल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. गोगोईंसोबत आणखी एक तरुणही होता. कर्मचाऱ्यांशी वाद झाल्यानंतर संपूर्ण प्रकरण पोलिसांकडे गेल्याने गोगोई यांची चौकशी करण्यात आली. 

गोगोई यांनी श्रीनगरच्या हॉटेलमधील खोली एका वेबसाईटवरुन बुक केली होती. इथे व्यवसायानिमित्त आलो असून मी बिझनेस क्रेडिट कार्डचा वापर करेन, असं त्यांनी वेबसाईटवर बुकिंगदरम्यान म्हटलं होतं.'गोगोई हॉटेलमध्ये चेक इन करत असताना त्यांच्यासोबत एक तरुणी होती. रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांना त्या तरुणीच्या वयावर संशय आला. त्यांनी तरुणीकडे ओळखपत्र मागितलं. ओळखपत्र मागताच ती घाबरली. पण शेवटी तिने आधार कार्ड दाखवलं. आधार कार्डवरुन ती बडगामची असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही स्थानिक तरुण आणि तरुणींना रुम देत नाही. त्यामुळे आम्ही तरुणीला नकार दिला आणि यावरुन गोगोई यांनी आमच्याशी वाद घातला, अशी माहिती हॉटेलमधील कर्मचारी एजाझ अहमद चाशू यांनी दिली आहे.

Web Title: jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.