Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला टळला; 5-6 किलो IED सह दहशतवादी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 15:39 IST2023-05-07T15:38:09+5:302023-05-07T15:39:20+5:30
Terrorist Arrest: या कारवाईनंतर लष्कराने परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे.

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला टळला; 5-6 किलो IED सह दहशतवादी ताब्यात
Terrorist Arrest: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी येथे 5-6 किलो IED सह एका दहशतवाद्याला अटक केली. इश्फाक अहमद वानी असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो पुलवामाच्या अरिगामचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. काश्मीर झोन पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली.
Pulwama Police averted a major tragedy by apprehending a #terror associate Ishfaq Ahmed Wani R/O Arigam #Pulwama and recovering an #IED (approx 5-6Kgs) on his disclosure. Case registered and investigation started.@JmuKmrPolicepic.twitter.com/DfGykYVL4p
— Kashmir Zone Police (@KashmirPolice) May 7, 2023
पोलिसांनी सांगितले की, आरोपी इश्फाककडून सुमारे 5-6 किलो आयईडी जप्त करण्यात आला आहे. आरोपीची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. या महिन्यात 22-24 मे रोजी श्रीनगर येथे G20 ची बैठक होणार आहे. हे लक्षात घेऊन लष्कराकडून कारवाई सुरू आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज पांडे यांचे यावर बारीक लक्ष आहे. राजौरी येथील 25 इन्फंट्री डिव्हिजनच्या दौऱ्यावर त्यांनी नियंत्रण रेषेच्या सुरक्षेचाही आढावा घेतला.
काही दिवसांपूर्वीच पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले, त्यामुळे वाहनाला आग लागली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने शोधमोहीम सुरू केली आहे. राजौरीपासून बारामुल्लापर्यंत लष्कर दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. यादरम्यान लष्कराने 4-5 दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे.