काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:38 PM2022-09-20T14:38:22+5:302022-09-20T14:39:29+5:30

दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे तीन दशकापासून बंद असलेले चित्रपटगृह अखेर सुरू झाले आहेत. INOXने श्रीनगरमध्ये हे मल्टीप्लेक्स तयार केले आहे.

Jammu Kashmir News | Cinema hall-multiplex started in Kashmir after 30 years | काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात...

काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात...

googlenewsNext

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील सिनेप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज तीन दशकांनंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सुरू झाले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर काश्मीरमधील लोकांना तीन दशकांनंतर प्रथमच मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आहे. 

दरम्यान, काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील राज्यात मल्टिप्लेक्स सुरू करण्याचा मार्ग तितका सोपा नव्हता. याआधीही काश्‍मीरमध्ये अनेकवेळा सिनेमा हॉल सुरू करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आता अखेर मल्टिप्लेक्स सुरू झाले आहे. श्रीनगरमध्ये आज उघडलेल्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट दाखवला जात आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहत आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल सुरू होतील
काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्याबाबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा सांगतात की, आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल बनवू. लवकरच अनंतनाग, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पूंछ आणि किश्तवाडमध्ये असे सिनेमा हॉल बांधले जातील. सिनेमागृह बांधून सरकारला काही संदेश द्यायचा आहे का? या प्रश्नावर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, यात कोणताही संदेश नाही. सिनेमा हे एक सशक्त सर्जनशील माध्यम आहे, जे लोकांची संस्कृती आणि मूल्ये प्रतिबिंबित करते. हे जगासाठी ज्ञान, नवनिर्मितीची दारे उघडते आणि लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची चांगली समज देते.

काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी प्रयत्न
1999 मध्ये फारुख अब्दुल्ला सरकारने सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रिगल, नीलम आणि ब्रॉडवे सिनेमा हॉलमध्येही चित्रपट दाखवण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र रिगल सिनेमाच्या पहिल्या शोदरम्यान दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेत एक जण ठार झाला आणि 12 जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहे बंद करण्यात आली. एकट्या श्रीनगरमध्ये दहा सिनेमा हॉल होते, ज्यामध्ये बॉलीवूडचे चित्रपट दाखवले जात होते. काश्मीरमधील अनेक जुनी चित्रपटगृहे नंतर रुग्णालये आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये बदलली गेली किंवा सुरक्षा दलांसाठी तात्पुरती शिबिरे म्हणून वापरली गेली. 

दहशतवाद्यांच्या भीतीने सिनेमागृहे बंद करण्यात आली 
1980 च्या अखेरपर्यंत एकट्या काश्मीर खोऱ्यात डझनभर सिनेमागृहे होती, पण दहशतवादी संघटनांच्या धमक्यांमुळे त्यांचे कामकाज बंद करावे लागले. 1990 च्या दशकात प्रशासनाने ही चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण सप्टेंबर 1999 मध्ये लाल चौकातील रिगल सिनेमावर झालेल्या प्राणघातक ग्रेनेड हल्ल्यानंतर हे प्रयत्न थांबले. यासोबतच नीलम आणि ब्रॉडवे या दोन चित्रपटगृहांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, त्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करावा लागला.
 

Web Title: Jammu Kashmir News | Cinema hall-multiplex started in Kashmir after 30 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.