जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:34 PM2023-09-04T18:34:58+5:302023-09-04T18:35:33+5:30
Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली, त्यानुसार शोधमोहिम सुरू झाली.
Jammu Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील चासानाजवळ सोमवारी (4 सप्टेंबर) शोध मोहिमेदरम्यान भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या घटनेत आतापर्यंत एक दहशतवादी मारला गेला आहे, तर एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे. सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
एडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना सोमवारी मिळाली होती. माहितीच्या आधारे शोधमोहिम सुरू झाली, यावेळी चासाना येथील तुली भागात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यावेळी पोलिसांनीहीह प्रत्युत्तर दिले. यात एक दहशतवादी मारला गेला आहे. तसेच, एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.
Encounter started at #Reasi on the basis of #Police input regarding presence of 02 terrorists . Encounter going on in Gali Sohab in Tuli area of #Chassana. Police and Army on the job.
— ADGP Jammu (@igpjmu) September 4, 2023
पूंछमध्ये चार दहशतवादी मारले गेले
याआधी जुलै महिन्यात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले होते की, पूंछमधील सिंध्रा भागात पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले. कारवाईत मारले गेलेले दहशतवादी परदेशी(पाकिस्तानी) दहशतवादी होते.
घुसखोरीचा प्रयत्न फसला
ऑगस्ट महिन्यातही लष्कराने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार करून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालाकोट सेक्टरमधील चकमकीच्या ठिकाणी एक एके-47 रायफल, दोन मॅगझिन, 30 राउंड, दोन हँडग्रेनेड आणि पाकिस्तानी मूळची काही औषधे जप्त करण्यात आली.