Jammu-kashmir: टेरर फंडिंगप्रकरणी NIA ची सर्वात मोठी कारवाई, 14 जिल्ह्यातील 45 ठिकाणांवर छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:46 AM2021-08-08T10:46:37+5:302021-08-08T10:49:17+5:30
Terror Funding in Jammu-Kashmir: जमात लश्कर, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि जैश-ए-मोहम्मदसारख्या संघटनांना फंडिंग होत असल्याची माहिती.
नवी दिल्ली: टेरर फंडिंग(terror funding) प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने जम्मू-काश्मीर(jammu-kashmir)मध्ये मोठी कारवाई केली आहे. एनआयए जम्मू-काश्मीरमधील 45 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापेमारी(raid in jammu-kashmir) करत आहे. एजंसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेरर फंडिंग प्रकरणातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असून, श्रीनगर, पुलवामा, कुपवाड़ा, डोडा, किश्तवाड़, रामबन, अनंतनाग, बड़गाम, राजौरी आणि शोपियांसह एकूण 14 जिल्ह्यांमध्ये कारवाई सुरू आहे.
'जमात-ए-इस्लामी'वर कारवाई
जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफसोबत मिळून एनआयएचे अधिकारी जमात-ए-इस्लामी संगटनेच्या सदस्यांच्या घरांमध्येही छापेमारी करत आहेत. या संघटनेवर केंद्र सरकारने पाकिस्तानचे समर्थन आणि कट्टरतावादी विचार असल्याचा ठपका ठेवत 2019 मध्ये बंदी घातली होती. बॅन असूनही संघटना जम्मू-काश्मीरमध्ये आपले काम करत होती. दक्षिण काश्मीरमध्येही या संघटनेवर मोठी कारवाई होत आहे.
यापूर्वी एनआयएने 10 जुलै रोजी टेरर फंडिंग प्रकरणात जम्मू-काश्मीरमधून 6 जणांना अटक केली होती. या छापेमारीच्या एक दिवस आधी जम्मू-काश्मीर सरकारमधील 11 कर्मचाऱ्यांना दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपामध्ये नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. यातील दोन आरोपी हिज्बुल-मुजाहिदीनचो म्होरक्या सयैद सलाहुद्दीनचे मुलं होती.
National Investigation Agency (NIA) is conducting raids at multiple locations in Jammu and Kashmir related to a terror funding case
— ANI (@ANI) August 8, 2021
Visuals from Anantnag district pic.twitter.com/IICd81bJ5Y
काय आहे टेरर फंडिंग प्रकरण ?
जम्मू-काश्मीरमधून 370 आणि 35 अ रद्द केल्यानंतर पाकिस्तान कावराबावरा झाला. पाकिस्तानच्या सीमेवरील कारवायांवरही भारतीय सैन्याने लगाम लावली. यासह पाकिस्तामधून भारतात घुसणारे दहशतवाही कमी झाले. यानंतर आता पाकिस्तानला ड्रोनद्वारे हत्यार आणि इतर सामग्री पुरवण्याची वेळ आली आहे. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितल्यानुसार, जमात आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याच्या नावाखाली पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयद्वारे दुबई आणि तुर्कीसारख्या देशांमधून फंडिंग घेऊन भारतात दहशतवादी कारवया करत आहे. आता याप्रकरणाचा तपास एनआयए(NIA) करत आहे.