जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ जवान शहीद तर ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 03:00 PM2020-10-05T15:00:23+5:302020-10-05T15:15:00+5:30
terrorists attack at pampore : या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर पाच जवान जखमी झाले आहेत.
जम्मू-काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांवर दहशतवादी हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पम्पोरमधील कांधीजल ब्रिजवर सीआपीएफच्या ११० बटालियनचे जवान आणि जम्मू-काश्मीरचे पोलीस रोड ओपनिंग ड्युटी (आरओपी) वर तैनात होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत. सध्या हा परिसर सुरक्षा रक्षकांनी घेरला असून शोध मोहीम सुरु आहे.
#UPDATE Of the five CRPF jawans, who were injured after terrorists fired upon the Force's road opening party (ROP), two jawans lost their lives. More details awaited. #JammuAndKashmirhttps://t.co/zIZ5pHKXw2
— ANI (@ANI) October 5, 2020
गेल्या आठवड्यात एलओसीवर पाकचा गोळीबार
पाकिस्तानी सैनिकांनी गेल्या गुरुवारी कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गुरुवारी सकाळी गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले होते, तर अन्य चार जण जखमी झाले होते. या जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे.