Jammu And Kashmir : गांदरबल चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 11:16 AM2019-11-12T11:16:17+5:302019-11-12T12:51:26+5:30
जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी चकमक सुरू झाली आहे.
श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मंगळवारी (12 नोव्हेंबर) चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये 'ऑपरेशन ऑलआऊट' सुरूच आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गांदरबलमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. याआधी बांदीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सोमवारी (11 नोव्हेंबर) चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले होते.
#UPDATE Jammu & Kashmir Police: One terrorist killed in an encounter with security forces in Gund, Ganderbal. https://t.co/gE6GlpWWus
— ANI (@ANI) November 12, 2019
मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये काही दिवसांपूर्वी आयईडी स्फोट झाल्याची माहिती समोर आली होती. या स्फोटात पाच जण जखमी झाले होते. जखमींमध्ये चार पोलीस कर्मचारी आणि एका नागरिकाचा समावेश होता. मंगळवारी (5 नोव्हेंबर) सकाळी 9.30 च्या सुमारास मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये आयईडी स्फोट झाला. इंफाळच्या थंगल बाजारातील शनि मंदिराजवळ हा स्फोट झाला आहे. या स्फोटात चार पोलीस कर्मचारी आणि एक नागरिक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इंफाळमधील हा परिसर हाय सिक्युरिटी असणारा समजला जातो. कोणत्याही दहशतवादी संघटनेने अद्याप या स्फोटाची जबाबदारी घेतलेली नाही. याआधी काही दिवसांपूर्वी तेलीपाटी परिसरात एक स्फोट झाला होता. त्यामध्ये बीएसएफचे तीन जवान जखमी झाले होते.
Jammu & Kashmir Police: One terrorist was killed in an encounter with security forces in Gund, Ganderbal, earlier today. (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/f9XmRz3eQd
— ANI (@ANI) November 12, 2019
जम्मू - काश्मीरमध्ये सोमवारी (4 नोव्हेंबर) दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. श्रीनगरच्या मौलाना आझाद मार्गावरील बाजारात झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर 15 जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी भरगर्दी असलेल्या बाजारात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. सैन्य दल आणि पोलिसांकडून हल्ला घडवून आणणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहीम राबविण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांत दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे.