पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 08:29 AM2020-08-29T08:29:47+5:302020-08-29T08:31:29+5:30
चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 24 तासांत जम्मू-काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील जादुरा गावात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी एक वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवित आहेत. चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भारतीय सुरक्षा दलांना पुलवामाच्या जादुरा भागात काही दहशतवादी लपून बसले आहेत आणि कोणता तरी दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलांनी त्या भागाला वेढा घातला. वेढा घालत असताना एका घरात काही दहशतवादी कारवाया करत असल्याचं दिसून आलं. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केला.
#UPDATE: One soldier who was critically injured has succumbed to his injuries in an encounter that started last night in Zadoora area of Pulwama. Joint operation in progress: PRO Defence, Srinagar https://t.co/dX8P0q1ltT
— ANI (@ANI) August 29, 2020
आतापर्यंत चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. अजूनही आणखी अतिरेकी त्या भागात लपून बसलेले असू शकतात, म्हणूनच भारतीय सुरक्षा दल अजूनही जागरूक आहेत आणि त्या भागात शोधमोहीम राबवित आहे.
J&K: Three unidentified terrorists killed by Police & security forces in an encounter that started last night in Zadoora area of Pulwama. Search is going on. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/QBUQfM85Qn
— ANI (@ANI) August 29, 2020
यापूर्वी शुक्रवारीही काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले होते आणि एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. अशा प्रकारे सुरक्षा दलांनी 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
#UPDATE Pulwama encounter update: 3 unidentified terrorists killed. Search going on. Further details shall follow: Kashmir Zone Police https://t.co/OJQ1ANu1dy
— ANI (@ANI) August 29, 2020