सीमेवर बीएसएफच्या जवानांना सापडले मोठे भुयार, पाकमध्ये बनवलेल्या वाळूच्या पिशव्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:53 PM2020-08-29T18:53:42+5:302020-08-29T19:09:11+5:30
या भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये भारत -पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांना मोठे भुयार सापडले आहे. याबाबतची माहिती शनिवारी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, भुयार सापडल्यानंतर या परिसरात जवानांनी मोठी शोधमोहीम सुरु केली आहे. तसेच, दहशतवादी कारवयांसाठी, घुसखोरी, अंमली पदार्थ, शस्त्रांची तस्करी करण्यासाठी या भुयाराचा वापर केल्याचा अंदाज असून भुयारात काही संशयास्पद वस्तू आढळल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मूमधील सांबा सेक्टरमध्ये गुरुवारी गस्तीवर असणाऱ्या बीएसएफच्या जवानांना भुयार सापडले. हे भुयार जवळपास २० मीटर लांबीचे आहे. या भुयारात वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या आहेत. यावर पाकिस्तानी शिक्के आहेत. दहशतवादी कारवायांसाठी आणि घुसखोरी करण्यासाठी हे खोदले असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
Jammu & Kashmir: Security forces deployed at the site where a tunnel has been found in Samba by Border Security Force (BSF).
— ANI (@ANI) August 29, 2020
The tunnel starts in Pakistan along the border and ends in Samba, according to Jammu BSF IG NS Jamwal. pic.twitter.com/4NAxvYfsjB
याचबरोबर, भुयारात सापडलेल्या वाळूच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर कराची आणि शकरगढ असे लिहिले आहे. तसेच, या पिशव्यांवर, त्या बनविल्याची आणि एक्सपायरीची तारीख सुद्धा आहे. त्यामुळे या पिशव्या नुकत्याच तयार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय, भुयारापासून पाकिस्तानची सीमा चौकी गुलजार जवळपास ७०० मीटर लांब आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या पंजाबमध्ये नुकतेच पाच सशस्त्र घुसखोरांच्या मृत्यूनंतर बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर शोध मोहीम राबविली आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या जवळपास ३३०० किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी बीएसएफकडे आहे. यापूर्वी सीमेवरील जम्मूच्या भागात बोगदे सापडले होते.
आणखी बातम्या...
काय असतात VIP फोन नंबर्स? लाखो रुपयांना विकले जातात...
धक्कादायक! आजीनं कर्ज फेडण्यासाठी एक महिन्याच्या नातीला १ लाख रुपयांना विकलं
- अॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर
- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा
- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार
- CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...
- आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार