दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 09:40 AM2020-01-31T09:40:43+5:302020-01-31T09:41:22+5:30

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदरने नाविदला प्रवास करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी हिजबुलकडून पैसे घेतले

Jammu Kashmir Suspended Dsp Was Suspected To Be On Payroll Of Terrorist | दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी 'त्या' अधिकाऱ्याला मिळत होता वर्षाकाठी 'फिक्स पगार'

googlenewsNext

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत केल्याप्रकरणी अटक असलेले माजी डीएसपी देविंदरसिंग यांच्याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दहशतवाद्यांकडून देविंदर सिंग यांना वर्षभराचा फिक्स पगार दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनकडून मिळत असे. हिजबुलचा दहशतवादी नवीद मुश्ताक याच्यासमवेत देविंदरला 11 जानेवारी रोजी पकडण्यात आले होते त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार तपास अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

जम्मूहून पाकिस्तानला जाण्याची योजना
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देविंदरने नाविदला प्रवास करण्यासाठी आणि सुरक्षित स्थळी लपविण्यासाठी हिजबुलकडून पैसे घेतले, तसेच वर्षभर त्याला मदत करण्यासाठी ठरल्याप्रमाणे पैसे घेतले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा त्याला पकडले गेले, तेव्हा तो नावेदला हिवाळ्यात राहण्यासाठी जम्मूला घेऊन जात होता. त्यानंतर तेथूनच त्याला पाकिस्तानला जायचं होतं.

पोलीस अधिकाऱ्यानेच दहशतवाद्यांशी केली हातमिळवणी; एनआयएने दाखल केला गुन्हा

त्या अधिकाऱ्याने सांगितले की ते पाकिस्तानात जाण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करणार होते. त्याचा तपास केला जात आहे. दविंदर 20-30 लाख रुपयांवर तडजोड केली होती. पण त्याला पूर्ण पैसे दिले गेले नाहीत. नाविदला त्याने आधीच जम्मूला नेले होते. तो बर्‍याच वर्षांपासून नाविदच्या संपर्कात होता आणि त्याच्या पेरोलवर काम करत होता. त्याला नियमांनुसार हिजबुलकडून पैसे मिळायचे.
तपासात मदत करत नाही

दहशतवाद्यांची ने-आण करणारा पोलीस अधिकारी राष्ट्रपती पदक विजेता; लाखो रुपये उकळले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा यंत्रणांना इरफानच्या फोनवरून नाविदविषयी माहिती मिळाली होती. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. इरफान हा वकील होता ज्याला नाविदसोबत पोलिसांनी पकडला होता. संभाषणातून समजले की तो आय १० या गाडीतून 11 जानेवारीला निघणार आहे त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. देविंदर तपासात सहकार्य करीत नाही. तो त्याच्या फोनमधील संपर्क पण ओळखत नाही असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. 

धक्कादायक...! श्रीनगर विमानतळाचा पोलिस अधिकारीच दहशतवाद्यांना कारमधून सोडत होता

दहशतवाद्यांना मदत करण्याच्या आरोपाअंतर्गत जम्मू काश्मीरचे डीएसपी देविंदर सिंहला अटक केल्याने खळबळ उडाली होती. या निलंबित अधिकाऱ्याविरुद्ध आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशी करत आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. एनआयएने देविंदरविरोधात शस्त्रास्त्र कायदा आणि यूएपीए कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तसेच युएपीए कायद्याच्या कलम 18, 19, 20 आणि 38, 39 नुसार गुन्हा नोंदविला आहे.

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांसोबत राष्ट्रपती पदक विजेत्या पोलीस उपअधीक्षकाला अटक 

Web Title: Jammu Kashmir Suspended Dsp Was Suspected To Be On Payroll Of Terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.