Jammu-Kashmir: बांदीपोरामध्ये सैन्याच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला, 1 जवान शहीद तर 3 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 05:55 PM2022-02-11T17:55:38+5:302022-02-11T18:20:38+5:30
Jammu-Kashmir: जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात 1 जवान शहीद झाला असून, चार जवान जखमी झाले. जखमींपैकी एका जवानाची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे.
J&K | Terrorists attack a joint party of security forces in Bandipora, 5 persons injured; Details awaited: Jammu & Kashmir Police
— ANI (@ANI) February 11, 2022
काश्मीरमधील बांदीपोरा येथे दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला. सुरक्षा दलावर केलेल्या या हल्ल्यात ग्रेनेड 1 पोलीस जवान शहीद झाला असून, चौघांची प्रकृती गंभीर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आज (शुक्रवारी) दुपारी पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाला लक्ष्य केले. दरम्यान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे.यामुळेच दहशतवाद्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यामुळेच सुरक्षा दलांवर अनेकदा असे भ्याड हल्ले केले जात आहेत.
डिसेंबरमध्ये दोन पोलिसांची हत्या
याआधी डिसेंबरमध्ये उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य केले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. 10 डिसेंबरच्या संध्याकाळी गुलशन चौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.