Jammu Kashmir : अनंतनागमध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 5 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 01:57 PM2019-01-31T13:57:38+5:302019-01-31T14:04:43+5:30

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले आहेत.

Jammu & Kashmir: Terrorists lob grenade near Shairbagh police station in Anantnag | Jammu Kashmir : अनंतनागमध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 5 जण जखमी

Jammu Kashmir : अनंतनागमध्ये पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 5 जण जखमी

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर जवानांनी परिसराला घेराव घालत हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. 

कुलगाम जिल्ह्यात बुधवारी (30 जानेवारी) एका पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यामधील दमहाल हांजीपुरातील एका पोलीस चौकीवर ग्रेनेड हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी फेकलेला ग्रेनेड रस्त्याशेजारी पडला आणि यात तीन नागरिक जखमी झाले.



दरम्यान,गेल्या 5 दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 20 हून अधिक वेळा ग्रेनेड हल्ले केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने घेतली होती.



Web Title: Jammu & Kashmir: Terrorists lob grenade near Shairbagh police station in Anantnag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.