Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, SPO शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 09:50 AM2021-02-19T09:50:49+5:302021-02-19T09:55:57+5:30

Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.

Jammu & Kashmir: Three LeT terrorists neutralised in Shopian | Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, SPO शहीद

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, SPO शहीद

googlenewsNext

श्रीनगर - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश त्याचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर दुसरीकडे बडगाममध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीरचे एसपीओ शहीद झाले आहेत. 

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील बीरवाहमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जम्मू-काश्मीर पोलीसचे एसपोओ अल्ताफ अहमद हे शहीद झाले आहेत. तसेच एक जवान देखील जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आणखी एक-दोन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाम चकमकीत जखमी झालेल्या एसजी सीटीचं नाव मंजूर अहमद असं आहे. सध्या त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू आहेत. 


 

Web Title: Jammu & Kashmir: Three LeT terrorists neutralised in Shopian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.