Jammu Kashmir : अनंतनागमध्ये लष्कराकडून हिजबुलच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 10:56 AM2019-10-16T10:56:24+5:302019-10-16T10:59:03+5:30
काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
श्रीनगर - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तिन्ही दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतावादी संघटनेचे सदस्य होते. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुलचा कमांडर नासिर चद्रू याचाही समावेश आहे.
आज सकाळी अनंतनागमधील पझलपोरा येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबार सुरू होता. अखेरीच लष्कराने तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळवले. चकमकीमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा कमांडर नासिर चद्रू यालाही ठार करण्यात आल्याने लष्कराला दहशतवाद्यांविरोधातील लढाईल मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.
Jammu & Kashmir Police: All three Hizbul Mujahideen terrorists led by commander Nasir Chadru are reported dead in the encounter in Anantnag. https://t.co/ohbVLliXla
— ANI (@ANI) October 16, 2019
दरम्यान, शोपियाँमध्ये दहशतवाद्यांनी सोमवारी एका ट्रकचालकाची हत्या केली. हा ट्रकचालक सफरचंदांची वाहतूक करत होता. तो मुळचा राजस्थानमधील होता.