Jammu Kashmir : सोपोरमध्ये जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:53 AM2018-12-13T09:53:02+5:302018-12-13T12:56:23+5:30
जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी (13 डिसेंबर) सकाळच्या सुमारास या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे आणि परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ब्राथ कला परिसरात बुधवारी (12 डिसेंबर) संध्याकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. भारतीय लष्कर, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफनं दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम राबवली.
परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. जवान घटनास्थळी पोहोचल्यानंतर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. पण रात्री जवानांनी मोहीम थांबवली आणि आज सकाळी पुन्हा सुरू झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.
दरम्यान, काश्मीर खोऱ्यात जवानांकडून वारंवार दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे. या वर्षात आतापर्यंत 235 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये स्थानिक दहशतवाद्यांची संख्या अधिक होती.
#UPDATE 2 terrorists neutralized in Sopore encounter have been identified as Ovis Butt and Tahir Ahmad of Lashkar-e-Taiba. Operation has concluded. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) December 13, 2018
Baramulla: Two terrorists killed in the encounter that started between security forces & terrorists at Baratkalan-Gund Mohalla of Sopore yesterday. Operation underway. #JammuAndKashmirpic.twitter.com/woNE2Ng0B2
— ANI (@ANI) December 13, 2018
Baramulla: Firing has stopped at Baratkalan-Gund Mohalla of Sopore where an encounter started between security forces & terrorists, yesterday. Search operation to start. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/j2HIzQTN7Z
— ANI (@ANI) December 13, 2018