काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून बस अडवण्याचा प्रयत्न, जवानांबरोबर चकमक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 12:19 PM2019-09-28T12:19:11+5:302019-09-28T12:59:51+5:30
जम्मू-काश्मीरमधल्या बटोटमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधल्या बटोटमध्ये दहशतवादी अन् सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे. संरक्षण मंत्रालयाच्या पीआरओंनी सांगितलं की, आज सकाळी 7.30 वाजता दोन संशयित व्यक्ती बटोटेजवळच्या NH 244वर एका बसला थांबवण्याचा प्रयत्न करत होते. परंतु वाहन चालकानं सतर्कता दाखवत गाडी थांबवली नाही. तसेच जवळच्याच एका लष्कराच्या चौकीला याची सूचना दिली. त्यानंतर क्यूआरटी टीमनं सर्च ऑपरेशन राबवलं, त्याच दरम्यान गोळीबार सुरू झाला असून, दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरू आहे.
लष्करी जवानांना येताना पाहिल्यानंतर दहशतवादी जवळच्याच नाल्यात लपून बसले. त्यानंतर जवानांनी त्या पूर्ण परिसराला घेरलं. पोलीस, लष्कराच्या जवानांनी धार्मुंड गाव आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराला घेराव घातला असून, सर्च ऑपरेशन सुरू आहे. पाच ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. हे कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधल्या दहशतवादी कारवाया कमी झालेल्या आहेत.Jammu & Kashmir: Today morning, 2 suspicious individuals tried to stop a civil vehicle at Batote in Ramban district. The driver did not stop the vehicle and informed Army QRT (Quick Response Team). Exchange of fire took place; security forces conducting investigation pic.twitter.com/GbfUlLdFM8
— ANI (@ANI) September 28, 2019
PRO Defence, Jammu: Today morning at about 7.30 am, 2 suspicious individuals tried to stop a civil vehicle at Batote. The driver did not stop the vehicle and informed Army QRT (Quick Response Team). Exchange of fire took place; operation still underway pic.twitter.com/PpKXikVfNC
— ANI (@ANI) September 28, 2019