जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 02:52 PM2018-01-09T14:52:29+5:302018-01-09T14:58:46+5:30
जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (9 जानेवारी) सकाळी चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
श्रीनगर - जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात मंगळवारी (9 जानेवारी) सकाळी चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. खात्मा करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सैन्य, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांमी संयुक्तरित्या परिसरात शोधमोहीम राबवली. शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. जवानांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
Two terrorists were gunned down by security forces in Anantnag's Larnoo in an encounter. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/ePJRhglaXP
— ANI (@ANI) January 9, 2018
#FLASH: Two terrorists gunned down by security forces in Anantnag's Larnoo during encounter. #JammuAndKashmir
— ANI (@ANI) January 9, 2018
प्रजासत्ताक दिनासाठी आखलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला
8 जानेवारी - 26 जानेवारीला राजधानी नवी दिल्लीमध्ये आखण्यात आलेला दहशतवादी हल्ला पोलिसांच्या सतर्कतेमुळं उधळला गेला आहे. पोलिसांनी मथुरामधून एका संशयिताला अटक केली आहे. तर दोन जण फरार झाले आहेत. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवशी राजधानी दिल्लीमध्ये मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्याला पोलिसांनी मथुरा जवळील भोपाळ शताब्दीमधून अटक केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताची कसून चौकशी केली. त्यावेळी आणखी दोन जण दिल्लीमध्ये लपून बसले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये छापा मारला. पण त्यापूर्वीच दोन संशयितांनी पलायन केलं होतं. 26 जानेवारी रोजी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात आणि अक्षरधान मंदिरावर हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचल्याचे माहितीमधून समोर आलं आहे. त्यामुळं सध्या दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि आयबी दोन्ही फरार संशयतीचा शोध घेत आहेत.
सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी घडवला IED स्फोट, चार पोलीस शहीद
6 जानेवारी - जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात चार पोलीस शहीद झाले होते. तर दुसरीकडे, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता.