Jammu Kashmir: काश्मीर घाटीत पुन्हा हिंसाचार; काल काश्मीरी पंडिताची हत्या, आज पोलिसावर गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 10:54 AM2022-05-13T10:54:56+5:302022-05-13T10:55:45+5:30
Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पोलिस काँस्टेबल रियाज अहमदवर गोळीबार करण्यात आला.
Jammu-Kashmir:जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी घटना वाढल्याये पाहायला मिळत आहेत. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज दहशतवाद्यांनी पोलीस हवालदार रियाझ अहमद यांच्यावर गोळ्या झाडल्या ज्यात ते गंभीर जखमी झाले. रियाझच्या घरावर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला आहे. सध्या रियाझ अहमद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. खोऱ्यातील पुलवामा येथील गुडुरा भागात ही घटना घडली. काश्मीरमध्ये काही तासांतच टार्गेट किलिंगची ही दुसरी घटना आहे.
काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर निदर्शने
गुरुवारी रात्री 36 वर्षीय काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर निदर्शने सुरू झाली. छावणीत राहणाऱ्या काश्मिरी पंडितांनी या हत्येविरोधात रास्ता रोको करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यासोबतच केंद्र सरकारवर अपयशाचा आरोप करण्यात आला. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटवून निदर्शने करण्यात आली.
Jammu & Kashmir | SPO Riyaz Ahmad Thoker, a local resident, shot at and injured by terrorists at Gudoora Pulwama; shifted to Pulwama hospital. Further details awaited: Police
— ANI (@ANI) May 13, 2022
दहशतवाद्यांचे टार्गेट किलिंग
मोठी दहशतवादी घटना करता येत नसल्यामुळे आता दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केली आहे. रियाझ अहमदवर झालेला हल्लाही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. यापूर्वी खोऱ्यात दहशतवाद्यांनी ज्याप्रकारे हत्या केल्या होत्या, त्यावरुन दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या झाली, त्यानंतर आज पोलीस हवालदार रियाझ अहमद यांना लक्ष्य करण्यात आले. याआधी शनिवारी अली जान रोडवर असलेल्या आयवा ब्रिजवर दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती.